Dahi shengdana chutney
दही शेंगदाणा चटणी....😉👌
![]() |
दही शेंगदाणा चटणी
साहित्य:
• ३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
• ३ ते ४ टेस्पून दही
• १ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट
• १ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
• चवीपुरते मीठ
• २ चिमटी साखर (ऐच्छिक)
• चिमूटभर जिरेपूड (ऐच्छिक)
• ३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
• ३ ते ४ टेस्पून दही
• १ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट
• १ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
• चवीपुरते मीठ
• २ चिमटी साखर (ऐच्छिक)
• चिमूटभर जिरेपूड (ऐच्छिक)
कृती:
• दही घुसळून घ्या. त्यात मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर, जिरेपूड, आणि दाण्याचा कूट घालून मिक्स करावे.
• वाटल्यास मिक्सरमध्ये एक-दोनदा काही सेकंदच फिरवावे.
• आपल्याला बारीक पेस्ट व्हायला नकोय, थोडी भरडसरच असावी.
• पण थोडी मिळून येण्यासाठी मिक्सर वापरावा.
• ही चटणी उपवासाच्या पदार्थांबरोबर (साबुदाणा थालीपीठ, साबुदाणे वडे, खिचडी) छान लागते.
• तसेच पोह्यांबरोबरही खायला चांगली वाटते.
टीप:
• दही किंचित आंबट हवे. नसल्यास काही थेंब लिंबाचा रस घालावा.
• दही आणि शेंगदाणा कुटाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box .